सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका
सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी तडीपार केले आहे तसे आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी काढले.
टोळीतील इसम नामे, १. मनोज राम गायकवाड, वय-४५ वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर (टोळी प्रमुख) २. रितेश मनोज गायकवाड, वय-२२ वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर ३. योगेश चंद्रकांत कोळेकर, वय-२५ वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर ४. आनंद राम गायकवाड, वय-४५ वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर याचेविरुध्द सन २०१५,२०१७,२०१८,२०२१,२०२२,२०२४ व २०२५ या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
तसेच दुसऱ्या टोळीतील इसम नामे, (१) राम शशिकांत तळभंडारे, वय २९ वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर (टोळी प्रमुख) (२) विजय कामेश वाघमारे, वय-३० वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर, (३) शिवाजी मारुती तळभंडारे, वय-४२ वर्षे, रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक, सोलापूर याचेविरुध्द सन २०१८ व २०२५ या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली






















