सोलापुरात ठाकरे सेनेला धक्का ; दोन माजी आमदार एक जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश
सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून त्यांचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि माजी आमदार शिवशरण पाटील हे तीन नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती असून त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने अमर पाटील आणि उत्तमप्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र काढले आहे.
अमर पाटील शिवशरण पाटील उत्तम प्रकाश खंदारे येथे गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजले. अमर पाटील दक्षिण तालुक्यातील नेते असून त्यांनी नुकतेच विधानसभा निवडणूक लढवली होती यासह उत्तम प्रकाश खंदारे हे माजी मंत्री आहेत शिवशरण पाटील एक माजी आमदार असून भाजपमधून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अमर पाटील यांना पाठिंबा दिला होता.
अमर पाटील आणि शिवशरण पाटील यांच्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात शिंदे गटाचे ताकद वाढणार असून शहरात खंदारे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या तीन मोठ्या नेत्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येते.