सोलापुरात शिवकालीन शस्त्र पाहण्याची मोठी संधी ; पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले, वेरी नाईस !
सोलापूर : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पोलीस कल्याण हॉल, सेवासदन शाळेजवळ दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
गुरुवारी पोलिस आयुक्त एस.राजकुमार यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मुर्तीस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शिवकालीन शस्ञ प्रदर्शनाची पोलिस आयुक्त एस.राजकुमार यांनी पाहणी करून या उपक्रमाचे कौतुक केले.
यानंतर सोलापूर जिल्हा लाटी काटी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कङलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंङ शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शना खाली दांडपट्टा, तलवार बाजी, परशु कुराड, लाटी काटी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.
अवघ्या सहा वर्षाच्या अर्णव पाठणकर या बाल शिवक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या प्रात्यक्षिकेत जागतिक रेका़र्ङब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन ,शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत ह्या शिवकालीन शस्ञ प्रदर्शनाचा लाभ सर्व सोलापूरातील शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले ..