सोलापुरातील हे कॉन्ट्रॅक्टर करणार काम बंद आंदोलन ; केंद्राच्या महत्वाच्या योजनेचे काम थांबणार
सोलापूर : ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशनच्या कामांची बिले येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास 20 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दिला आहे.
संघटनेची बैठक होऊन हा सामूहिक रित्या निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात एक हजार पाणी पुरवठ्याची कामे सुरू असून बिले मात्र वेळेवर येत नाहीत, येत्या आठ दिवसांत बिले न मिळाल्यास आणि आमच्या अडचणी सोडवल्या नाही तर 20 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला.
मुदतवाढ देताना विना दंड मुदतवाढ द्या, जादा दाराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर द्या, जलजीवन मिशनच्या कामांना नैसर्गिक वाळू वापरा अशी अट असताना वाळू उपलब्ध होत नाही, कामे पूर्ण होऊनही सुरक्षा रक्कम अजूनही अदा करण्यात आली नाही अशा अनेक मागण्या संघटनेच्या आहेत.