Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात संघाची चिंतन बैठक ; आमदार विजय देशमुख यांच्या गैरहजेरीची सर्वाधिक चर्चा ; काय घडले….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 September 2024
in political
0
सोलापुरात संघाची चिंतन बैठक ; आमदार विजय देशमुख यांच्या गैरहजेरीची सर्वाधिक चर्चा ; काय घडले….
0
SHARES
526
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात संघाची चिंतन बैठक ; आमदार विजय देशमुख यांच्या गैरहजेरीची सर्वाधिक चर्चा ; काय घडले….

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात बाळासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी समन्वयाची महत्त्वपूर्ण बैठक हरीभाई देवकरण प्रशाला या ठिकाणी पार पडली.

या बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठकीला दांडी मारणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुख यांची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हरीभाई देवकरण प्रशाला येथे पार पाडली. ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधींनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची सक्त सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेली असताना या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख हे गैरहजर असल्याचे दिसून आले.

या बैठकीला संघाचे पुणे विभागीय कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, प्रवीण दबडगावकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, माजी महापौर शोभा बनशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेले पांडुरंग दिंड्डी, दक्षिण मतदार संघामध्ये इच्छुक असलेले उदय पाटील आदी इच्छुक आणि दावेदार आमंत्रित होते.

काही कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीच्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गैरहजेरीची फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. तिथेच शहर उत्तर मधल्या एका जबाबदार स्वयंसेवकाने अशा बैठकींना मालक महत्त्व देत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली.

संघ परीवाराची इतकी महत्वाची प्रदेश पातळीवरील नेत्यांसह  बैठक सोलापुरात असूनही उपस्थित रहात नाहीत,  संघाचे स्वयंसेवक व परिवारातील कार्यकर्ते लोकसभा असो की  विधानसभा जणू आपल्या घरात लग्नकार्य असल्यासारखे पळतात, देव, देश धर्मासाठी निस्वार्थ भावनेने काम करतात मात्र संघटनेच्या व  हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बळावर लोकप्रतिनिधी झालेले लोक मात्र स्वतःला मालक समजू लागलेत. ही बैठक आहे ती माझ्यासाठी नाही, मी वेगळी स्वतंत्र बैठक  लावेन आणि संपूर्ण संघालाच  माझ्याकडे चर्चेला बोलावून घेईन ही भूमिका माध्यमांकडे कधीही न व्यक्त होणारे आमदार डायरेक्ट प्रेसला व्यक्त करतात ! त्यांच्या या गैरहजेरीचं आता संघ श्रेष्ठी आणि भाजपा श्रेष्ठी नेमकी कशी दखल घेतात हे बघावे लागेल असा एक ज्येष्ठ कार्यकर्ता हताशपणाने बोलताना दिसला.

याच वेळी साखर पेठेतील एका संघ स्वयंसेवकाने साखर पेठेच्या जागेवरती वक्फ बोर्डाने नाव लावले आणि ती जागा वक्फ बोर्डाची आहे.  महानगरपालिकेकडून येथील नागरिकांना  बांधलेले घर तर सोडा, साध्या घराच्या किरकोळ दुरुस्तीची सुद्धा परवानगी देत नाही . ही तक्रार घेऊन शहर उत्तरचे आमदारांकडे गेले असता शहर उत्तरचे आमदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अशी ही नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

आमदार विजय देशमुख यांना महत्त्वाचे काम असल्याने ते या बैठकीला येऊ शकले नाहीत अशी माहिती ही समोर आले आहे दरम्यान यावर विजयकुमार देशमुख समर्थकांकडून प्रतिक्रिया देताना भाजपात नव्याने दाखल झालेले लोक मात्र या बैठकीला आम्ही कसे उपस्थित होतो आणि आमच्याकडे कसे लक्ष केंद्रित होईल हे सांगण्यासाठी धडपड केल्याचा टोला हाणला.

Tags: #राष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPMLA vijaykumar deshmukhSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

विद्यापीठाची ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी ; परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची महापूजा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची महापूजा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची महापूजा

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group