सोलापुरात प्रणिती शिंदे जिंकल्या ! एक लाखाच्या पैजेचे काय झाले ‘प्रशांतराव’
सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळाली. काँग्रेसचा सलग तिसरा पराभव होणार की भाजप हॅट्रिक साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते माढा मतदारसंघात ही यावेळी चुरस दिसून आली मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील यांनी या निवडणुकीत दंड थोपटल्याने भाजप समोर मोठे आव्हान होते.
राम सातपुते की प्रणिती शिंदे ; दोन राजकीय प्रशांत मध्ये लागली एक लाखाची पैज
मतदानानंतर तब्बल एक महिन्याचा गॅप असल्याने बघेल तिकडे प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द होता फोन निवडून येणार त्यासाठी पैजा लागल्या होत्या. माढा मतदारसंघात तर बुलेटची पैज लागली. सोलापुरात मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत बाबर या दोन नेत्यांमध्ये एक लाखाची पैज लागली.
महाराष्ट्र टाइम्स या डिजिटल वाहिनीने या दोन नेत्यांची मुलाखत घेतली, ती मुलाखत इतकी रंगली की, शेवट एक लाखाच्या पैजेवर संपली. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकल्या की मनसेचे प्रशांत इंगळे हे राष्ट्रवादीचे प्रशांत बाबर यांना लाख रुपये देणार आणि भाजपचे राम सातपुते जिंकले की बाबर इंगळे यांना लाख रुपये देणार असे ठरले होते.
या पैजेचा बातम्या सर्वच प्रादेशिक वाहिन्यांनी लावल्या, त्याची सोलापूरसह राज्यात चर्चा झाली. आता मंगळवारी निकाल जाहीर झाला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या. त्यामुळे त्या एक लाखाच्या पैजेचे काय झाले असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या दोन नेत्यांचा केवळ प्रसिध्दी स्टंट होता की खरेच आता ते पैसे देणार याकडे लक्ष लागले आहे.