सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार
सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी याच्यासह त्याचा मुलगा अलीम कुरेशी या दोघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
१) इब्राहीम खाजासाब कुरेशी, वय ५२ वर्षे, रा. शास्त्री नगर अन्सारी चौक, सोलापुर २) अलिम इब्राहीम कुरेशी, वय ३५ वर्षे, रा. शास्त्री नगर, अन्सारी चौक, सोलापुर याचेविरुध्द सन २००९,२०१५,२०१६,२०१८,२०२१ व २०२५ या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, जनावरांची निर्दयतेने, क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे, गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे, गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कवाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. २०१२/२०२५ दि.०४/०८/२०२५ अन्वये, टोळीतील इसम नामे, १) इब्राहीम खाजासाब कुरेशी, वय ५२ वर्षे, रा. शास्त्री नगर अन्सारी चौक, सोलापुर २) अलिम इब्राहीम कुरेशी, वय ३५ वर्षे, रा. शास्त्री नगर, अन्सारी चौक, सोलापुर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलेबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे.