सोलापुरात दौरा नरेंद्र मोदींचा चर्चा मात्र दिलीप मानेंच्या प्रवेशाची
सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाच्या वर्षात तिसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. पहिला दौरा रे नगर येथील 20,000 घरकुलाच्या लोकार्पणाचा, दुसरा दौरा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आणि आता तिसरा दौरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते काही वेळात सोलापुरात येणार आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर होऊनही पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नाही. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नंतर माघारी घेतली. आता मालक काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. त्यातच नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले.
सोमवारी ‘सिंहासन’वर बातमी प्रसिद्ध झाल्यावर ती एकच चर्चा सुरू झाली. नक्की दिलीप माने भाजपमध्ये प्रवेश करणार का? असे प्रश्न एकमेकांना विचारले जाऊ लागले.
शहरी भागासह ग्रामीण भागातही दिलीप माने प्रवेश करणार का याची उत्सुकता दिसून आली आहे.
मंगळवार नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोलापूर त्यांच्या स्वागताला सज्ज झाले असताना मोदींपेक्षा दिलीप मानेंच्या प्रवेशाचीच उत्सुकता आणि चर्चा दुपारी तीन पर्यंत ऐकण्यास मिळत होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरातील भाषणावेळी स्टेजवर काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.