सोलापुरात ऑक्टोबर अखेर विमानसेवा सुरू होणार ; आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे प्रयत्न
सोलापूरच्या विमानसेवा संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे झालेल्या बैठकीमध्ये सोलापूरचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये येत्या ऑक्टोबर अखेर सोलापूर मध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आले आहे.
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. सोलापूरच्या सर्वागीण विकासासाठी अनेक वर्षांपासून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. ती आता पूर्णत्वास जात आहे. यामुळे ही सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या फेसबुकवरून याबाबत माहिती दिली आहे.
उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, जी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे व याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल. यात सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने घेतले जाईल.
बैठकीस उपस्थित Airline प्रतिनिधीकडून काही commercial flights सुद्धा सुरू करण्याचे नियोजन असून त्यासंदर्भातही बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आले.
या बैठकीस सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, Fly 91 व Alliance Air चे प्रतिनिधी उपस्थित होते.