सोलापुरात लक्ष्मण हाक्केंसाठी सर्वपक्षीय धनगर नेते एकवटले !
ओबीसी नेते लक्ष्मण हाक्के यांच्यावर प्राणघतक हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करून हाक्के अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाक्के महाराष्ट्रभर ओबीसी समाजातील सर्वांना एकत्र करण्यासाठी सभा घेत आहेत आंदोलन करत आहेत या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज एकत्र येत आहे हे पाहूनच काही समाजकंटकांनी लक्ष्मण हाक्के व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रकार चालू केला आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत हाकेंच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला केला आहे.
हाक्के हे लोकशाही मार्गाने ओबीसी हक्कासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत हाक्के केवळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत आहेत आजपर्यंत त्यांच्यावर नऊ वेळा असे हल्ले झालेले आहेत अद्याप पर्यंत एकाही हल्ल्यातील हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आम्हास असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे का एवढ्या मोठ्या घटना घडूनही गृहमंत्री तथा मुख्यमंत्री गप्प का आहेत.
पोलिसांकडून हल्लेखोरांवर का कारवाई केली जात नाही असा आमचा सवाल आहे त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते घनश्याम हक्के यांच्यावरही खोटा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा व लक्ष्मण हाके यांना तात्काळ अतिरिक्तत पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यापुढे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यावर व नेत्यांवरील हल्ले धनगर समाज खपवून घेणार नाही हक्के यांच्या समर्थनार्थ धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात येत आहे.
यावेळी धनगर समाजाचे नेते नरेंद्र काळे, चेतन नरोटे, अर्जुन सलगर, राम वाकसे, उमेश कोळेकर, राज बंडगर मनीषा माने, सिद्धारूढ बेडग्नूर देवेंद्र मदने सोपान खांडेकर डीडी पांढरे विनोद मोठे बिराप्पा बंडगर सुजित कोकरे नारायण माने शिवाजी काकडे शेखर बंगाळे गोविंद धुळे संदीप धायगुडे सोमनाथ पांढरे यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















