सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे केली ही मागणी ; एनसीपी भवनात भाजप उमेदवारांचा सत्कार
राष्ट्रवादी भवन कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांचे स्वागत सत्कार सोहळा व राष्ट्रवादी पदाधिकारी परिचय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा सत्कार सोहळा महायुती नावाचे फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
यावेळी सोलापुरात ही महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य निवडणुकासाठी २५ जागांची मागणी केली आहे त्या प्रमाणे राष्ट्रवादीला ही २५ जागा मिळाव्यात आणि सम – समान न्याय द्यावा अशी मागणी केली.
महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील त्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता मनापासून जोमाने काम करेल, महायुतील आपण सर्वजण मिळून एकत्रित ताकत लाऊन सर्वोतोपरी प्रयत्न करू आणि सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवू असा विश्वास जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद मुस्तारे महीला अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केला.
यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपल्या मनोगतात महायुतीत यूतीधर्म कसा पाळावा हे उत्तम उदाहरण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे असे कौतुक करून येणार्या महापालिकेत राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळतील महायुतील शिवसेना प्रमाणेच राष्ट्रवादीला देखील समान न्याय देण्याची भुमिका घेऊ असा शब्द दिला.
उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या मनोगतात सर्व उमेदवारांचे एकत्रित सत्कार करून सर्व पदाधिकारी परिचय बैठक घेतली यांचे कौतुक करून राष्ट्रवादीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही, महायुतीचा धर्म पाळला जाईल, सर्वांचा सन्मान राखला जाईल असा शब्द दिला.
या प्रसंगी माजी आमदार रविकांत पाटील , माजी नगरसेवक नागेश गायकवाड, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे
जेष्ठ नेते हेमंत चौधरी, अनिल उकरंडे, ॲड. सलीम नदाफ, महेश निकंबे,
महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, साजिद पटेल, चेतन गायकवाड, खलिल शेख, सनी देवकते, युवक समन्वयक दत्तात्रय बडगंची, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, कार्याध्यक्ष पल्लवी पाटील, अल्पसंख्याकचे विभाग अध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष संजय मोरे, सामाजिक न्यायचे राजू बेळेनवरु, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सेवादलचे प्रकाश जाधव, सिध्देश्वर आंबट, उत्तर विधानसभेचे ॲड.अमोल कोटिवाले, मनोज शेरला, प्रकाश झाडबुके, मध्य विधानसभेचे अल्मेराज आबादीराजे, दक्षिण विधानसभेचे वाघमारे, भालशंकर, डॉक्टर सेलचे डॉ.संदीप माने, महेश वसगडेकर, वैद्यकीय विभागचे बसवराज कोळी, VJNT विभागचे रुपेश भोसले, असंघटित विभागचे मार्तंड शिंगारे, संजय सांगळे, वाहतूक सेलचे इरफान शेख, OBC सेल चे अनिल छत्रबंद,बाबू पटेल , दिव्यांग विभाग यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.