सोलापुरात आराधी महिलांना महाप्रसादाचे वाटप ; यलम्मा देवी संस्थेचा उपक्रम
यलम्मा देवी बहुउद्देशीय संस्था ट्रस्टी , शिरवळ
यांच्यावतीने हद्दवाढ भागात दीक्षित नगर इथे आराधी महिलांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आले आहे.
आराधी महिला या नऊ दिवस देवीची पूजा अर्चा करतात. अशा या भक्तांसाठी यल्लमा देवी संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थापक अध्यक्ष मडोळप्पा पुजारी व सुरेखा घाटोळे यांच्या अध्यक्षतेच्या खाली आराध्य महिलांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा व शहर काँग्रेसचे प्रवक्ते नागनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते यशवंत फडतरे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
यलम्मा देवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात या माध्यमातून गोरगरीब वंचित दलितांना मदतीचा हात दिला जातो याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेतल्याचे अध्यक्ष मडोळप्पा पुजारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अंजना कदम, रंजना इंगळे, रंजना कदम, लक्ष्मीबाई भूशेट्टी, संगीता कोरे, शारदा कांबळे, शिवराज कोरे, हंसाबाई संके, जयश्री शिरोळशेट्टी, भालचंद्र बनसोडे, राजू गोपने, हनुमंत बनसोडे, काशीबाई वाघमोडे, ज्योती फकरे, रेश्मा महासंक, उज्वला कांबळे, रेणुका घाटोळे, निलेश घाटोळे, सोमनाथ जाधव, तुषार पुजारी, तन्मय पुजारी, तनिष्का पुजारी, महादेव मोरे, राहुल भोसले यांच्यासह या भागातील आराधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक देवेंद्र सेनसाखळे यांनी परिश्रम घेतले.