
बाबा मिस्त्री यांची काँग्रेसच्या स्टेजवर एन्ट्री ; 20 चे काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल मजबूत
सोलापूर : यंदा प्रथमच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री यांनी महापालिका निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान बाबा नसल्याने आणि रफीक इनामदार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्याने काँग्रेसची कमान माजी नगरसेविका अनुराधा काटकर आणि या भागातील माजी नगरसेवक जब्बार शेख यांचे चिरंजीव अझरोद्दीन शेख तसेच दिवंगत काँग्रेस नेते नागनाथ रणधिरे यांचे चिरंजीव श्रीशैल रणधिरे यांच्या खांद्यावर आहे.
या निवडणुकीत प्रभाग वीस मध्ये काँग्रेसने यंदा युवा उमेदवार माजी नगरसेवक जब्बार शेख यांचे चिरंजीव अजरोद्दीन शेख यांना उमेदवारी दिली आहे. तसेच माजी नगरसेविका अनुराधा काटकर या सुद्धा काँग्रेसच्या पॅनल मध्ये आहेत. दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते नागनाथ रणधिरे यांचे नातू सिद्धार्थ श्रीशैल रणधिरे यांनी तुतारी हातात घेतले आहे त्यांच्या सोबतीला नुसरत शकील शेख या निवडणूक रिंगणात आहेत. नुकतीच खासदार प्रणिती शिंदे यांची सभा नई जिंदगीत झाली. त्या सभेला बाबा मिस्त्री यांनी पण हजेरी लावली. त्यामुळे या पॅनल मध्ये उत्साह संचारला आहे.
तौफिक शेख यांचे पॅनल जरी या प्रभागात मजबूत मानले जात असले तरी आता बाबा यांच्या एन्ट्री मुळे प्रतिसाद वाढला आहे. हा भाग काँग्रेसला मानणारा आहे. सर्व समाज याठिकाणी काँग्रेसला मतदान करतो त्यामुळे राहिलेल्या तीन दिवसात आणखी जोर लावला जाऊ शकतो. त्यांचा निश्चितच या पॅनलला फायदा होणार आहे.





















