


अय्यो ! काँग्रेसचा पचका झाला रे ! प्रभाग 21 अपक्षाने पाठिंबा देऊन पुन्हा पाठिंबा मागे घेतला
सोलापूर : महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 21 मध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप शिवसेना अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. स्वतःचा प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात उडी मारलेले रियाज हुंडेकरी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी स्वतःच्या मुलीला या प्रभागात उभे केले आहे.
काँग्रेस कार्यकर्ते भीमाशंकर टेकाळे यांनी आपल्या सुनेला उमेदवारी घेतली आहे आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले अन् दोन वेळा पराभव झालेले भीमाशंकर म्हेत्रे हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत.
भाजपकडून इच्छुक असलेल्या आणि लिंगायत समाजामध्ये नाव असलेला युवा चेहरा म्हणून संजय म्हेत्रे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती पण भाजपने त्यांना डावलून उमेदवारी दुसऱ्याला दिली त्यामुळे संजय म्हेत्रे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे.
त्याने सफरचंद घेऊन निवडणुकीचा प्रचार सुरू केला पण भीमाशंकर म्हेत्रे यांनी मध्यस्थी करून समाज बांधवांचा दबाव टाकून संजय म्हेत्रे याला पाठिंबा देण्यास भाग पाडले. तसे फोटो काढण्यात आले, व्हिडिओ बनवण्यात आला, पण दुसऱ्या दिवशी मात्र म्हेत्रे यांनी पाठिंबाचा निर्णय बदलून पुन्हा आपला प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा मोठा पचका झाल्याचे पाहायला मिळते. लिंगायत समाजाची मोठ्या प्रमाणात मते असल्याने हे मते संजय म्हेत्रे घेऊ शकतात त्यामुळे याचा फटका निश्चितच काँग्रेसला बसणार आहे.






















