




सोलापूरला दिल्ली दरबारी कायदेशीर मदतीची ग्वाही ; खा. उज्वल निकम यांचा केतन वोरा मित्र परिवाराने केला सत्कार
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे नूतन राज्यसभा सदस्य खासदार तथा प्रसिद्ध विधीज्ञ उज्वल निकम यांचा सोलापुरात केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सोलापूरच्या लकी चौकातील पूनम भोज हॉटेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
राज्यसभा सदस्यांची शपथ घेतल्यानंतर प्रथमच खासदार उज्वल निकम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्या प्रित्यर्थ केतन व मित्रपरिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमास यतीन शहा सुहासिनी शहा चंद्रिका चौहान, डॉक्टर आग्रजा चिटणीस, केतन वोरा यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी उपस्थित त्यांना संबोधित करताना खासदार निकम यांनी दिल्ली दरबारी सोलापूरला कायमच आपण कायदेशीर बाबतीत मदत करू अशी ग्वाही दिली. राजकारण आणि वकिली करताना निश्चितच त्रास होतो पण त्यातून मार्ग काढावा लागतो. सध्या विरोधक जे देशाच्या जनतेची दिशाभूल करत आहेत त्यावर त्यांनी सडकून टीका केली यामुळे संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत नाही हे दुर्दैव असल्याचे सांगितले. या सत्कार बद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानताना विशेष करून केतन वोरा यांच्या कार्याचे कौतुक केले.
प्रारंभी यतीन शहा यांनी खासदार एडवोकेट निकम यांची वकिलीची वाटचाल कौटुंबिक जीवन अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
केतन वोरा यांनी कार्यक्रमाचे आभार मानताना उज्वल निकम यांनी कायमच सोलापूरकरांना आपले सहकार्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन चंद्रिका चौहान यांनी केले.