सोलापुरात भरतशेठ गोगावले समोरच मनीष काळजे व मनोज शेजवाळ यांच्यात राडा ; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात वाजता येतील कार्यालयाला भेट देऊन सत्कार स्वीकारला. यावेळी बराच वेळ पत्रकार परिषद चालली.
भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी इतर पदाधिकारी शासकीय विश्रामगृहावर थांबून होते बराच वेळ झाले ते शासकीय विश्रामगृहावर येत नाहीत म्हणून माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ हे काळजे यांच्या कार्यालयाकडे आले आत आल्यानंतर एवढा वेळ का? असे त्यांनी विचारले असता दौरा हा वेळेनुसार सुरू असल्याचे काळजे यांनी सांगितले.
पण यावेळी पुन्हा वेळ लागत असल्याने शेजवाळ यांनी काळजे यांच्यावर हात उगारला त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाला. मंत्री गोगावले यांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांमधील भांडणे सोडवली अन्यथा या ठिकाणी मोठा वाद झाला असता.
शिवसेनेमधील गटबाजी यावेळी समोर आली आहे. मनीष काळजे यांचा स्वतंत्र गट असून इतर नेत्यांचा वेगळा गट पाहायला मिळतो. यावेळी बऱ्याच कुरघोड्या सुद्धा पाहायला मिळतात यामुळे निश्चितच एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोलापुरात बदनाम होताना दिसत आहे.