सोलापुरात पोलिसांना सापडले बारा बांगलादेशी ; या ठिकाणी होते वास्तव्यात
सोलापूर : भारत देशात अवैद्य मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करत असलेल्या बारा बांगलादेशींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
एमआयडीसी रोड सोलापूर या भागात 5 मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना मिळून आले आहेत.
नासीर सरकार मो. बदी उज्जमान वय-२२ वर्षे, रा- ग्राम तैगोरिया भाग राजशाही जि नाटोर बांग्लादेश २) मोहम्मद नजीरउल्ला इस्लाम वय-३० वर्षे रा- कौदमपल्ली जि भोगुर बांग्लादेश ३) मोहम्मद मिजानूर रोहमन, वय-२६ वर्षे, रा- नेत्रकोना बांग्लादेश ४) बाबुमिया सुलतान वय-२५ वर्षे, रा- कोदंलपुर गोसाई राहत शरियतपुर बांग्लादेश ५) शफिक रशिद मोडंल वय-३१ वर्षे, रा-ढाका बांग्लादेश ६) मोहम्मद रहुलआमीन खलील फोराजी वय-३३ वर्षे, रा-परगना पश्चिम बंगाल रावगा बांग्लादेश ७) इम्रान नुरआलम हुसेन वय-२७वर्षे, रा- कोदंलपुर गोसाई राहत शरियतपुर बांग्लादेश ८) महमद हजरतअली पोलाश वय ३१ वर्षे, रा- ग्राम काजीबारा जि बोगुरगा राजशाही बांग्लादेश ९) महमद हजरतअली पोलाश वय ३१ वर्षे, रा- ग्राम नारहट्टा तथा तहालून जि बुगुरा बांग्लादेश १०) मोहम्मद सोहेल जाबेदअल्ली सरदार, वय-२२ वर्षे, रा- ढाका बांग्लादेश ११) अलाल नुरइस्लाम मियाँ वय-३५ वर्षे, रा-नॉर्थ परगना पश्चिम बंगाल १२) मोहम्मद अलीमीन हानिफ बेफिरी, वय-२९ वर्षे, रा- नॉर्थ परगना पश्चिम बंगाल देश बांग्लादेश अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैदय प्रवासी परवानगी, कागदपत्राशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी (नोदंणी) अधिकारी यांचे लेखी परवानगी शिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधारकार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असताना मिळून आले म्हणून वरील आरोपीताविरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल आहे.
या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात या इसमाना कुणी वास्तव्यास ठेवले होते, याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करीत आहेत.