मार्डी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ; भाऊंचा वाढदिवस होणार असा साजरा
उत्तर सोलापूर/प्रतिनिधी उत्तर तालुक्यातील मार्डी येथे भाजप कार्यकारणी सद्स्य शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अझर शेख यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य तथा माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार, भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रुक्मिणीदेवी पतसंस्था मार्डी येथे १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वा पासून करण्यात आले आहे.
तसेच मौजे मार्डी येथील अण्णाभाऊ साठे नगरयेथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयाचे लोकार्पण होणार आहे तीर्थक्षेत्र मार्डी येथील मार्कंडऋषी देवस्थान येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थांनी रक्तदान करून जीवनदान कार्यात मोठे योगदान देण्यासाठी जास्तीत-जास्त सहभागी व्हावे असे आवाहन उत्तर तालुका भाजप पदाधिकारी, शहाजीराजे पवार युवा मंच मार्डी, उत्तर सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.