सोलापुरात माकपच्या लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा ; कॉ.आडम मास्तर यांनी केले हे आवाहन
सोलापूर – सबका साथ सबका विकास ची घोषणा देत नरेंद मोदी यांनी सत्त काबीज केली आणि जवळ जवळ 40 च्या वर योजना जाहीर केल्या आहेत.त्या योजनांचा कितपत लाभ जनतेला मिळाला हा संशोधनाचा भाग आहे. खोटी आश्वासने देऊन खोटी स्वप्ने विकणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी च्या उमेदवाराचा विजय करा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेचे प्रश्न आणि जनेतचा आवाज बुलंद करण्यासाठी माकपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करा असे लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी संबोधित केले.
रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत माकप ची राजकीय भूमिका आणि केंद्र आणि राज्य सरकार चुकीच्या धोरणांचा जनतेवर होत असलेला दुष्परिणाम यावर लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावे म्हणून डॉ.स्वामिनाथन आयोग आणि असंघटीत कामगारांना किमान दहा पेन्शन मिळाले म्हणून कोशियारी आयोगाच्या शिफारशी लागू करा यासाठी अविरतपणे सभागृहात लोकप्रतिनिधी आणि सभागृहाबाहेर जनतेचा लढा सुरू आहे याकडे सरकार हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचा आरोप केले.
माकपचे जिल्हा सचिव ॲड.एम.एच.शेख यांनी मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगमी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही सर्व लोकशाही ,समाजवादी , धर्मनिरपेक्ष पक्ष पुरस्कृत महाविकास आघाडी उमेदवाराला आपला खासदार म्हणून निवडून द्या असे आवाहन केले.
माकपचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका कॉ.नलिनीताई कलबुर्गी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर कॉ.सिद्धप्पा कलशेट्टी,माजी नगरसेविका कामिनीताई आडम , युसुफ मेजर , व्यकंटेश कोंगारी,शेवंता देशमुख,कुरमया म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, म.हनिफ सातखेड,शंकर म्हेत्रे, ॲड.अनिल वासम, श्रीनिवास म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.
कॉ.युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केले. ॲड.अनिल वासम यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या मेळाव्यात माकप चे जिल्हा समिती सदस्य,शाखा सचिव आणि शाखा सदस्य उपस्थित होते.