सोलापुरात कोयत्याने वार ; “आमच्या मंडळाची मीटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटींगला का गेलास”
सोलापूर : जयंती मंडळाच्या मीटिंगला न दुसऱ्या मंडळाच्या मीटिंगला गेल्याचा राग मनात धरून एकावर कोयत्याने वार करून दुसऱ्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कुमठा नाका परिसरात घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शन अच्युत भोसले, वय-२९ वर्षे, राहणार भारत नगर कुमठा नाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पा कांबळे, शेखर सुरेकर, अभिषेक रोहिटे, एक अज्ञात इसम रा-तक्षशिल नगर यांच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ रोहित असे दोघे फिर्यादीचा चहाचा गाडा बंद करून घरी येत असताना क्रीडा संकुलच्या गेट समोर फिर्यादीचे घर जवळ राहणारे यातील आरोपीने यांनी फिर्यादीस पाहून “याला लय मस्ती आली आहे, पुण्यावरून येथे करून खायला आला आहे, आमच्या मंडळाची मिटींग सोडून तु रावण साम्राज्याच्या मिटींगला का गेला” असे म्हणून आरोपी अप्पा कांबळे याने त्याचे हातातील कोयत्याने फिर्यादीचे डावे हाताचे कोपऱ्यावर व पाठीवर मारून जखमी केले. “आज तू वाचला, तुला उदया खल्लास करतो” अशी दमदाटी केली आहे तसेच फिर्यादीचे भाऊ भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यानां देखील शिवीगाळ दमदाटी केली. तपास फौजदार बनकर हे करीत आहेत.