सोलापुरातील सालारचा ‘ब्रँड’ दोन जिल्ह्यातून तडीपार
इसम नामे, इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार, वय-३२ वर्षे, रा. मक्का मशिदीचे पाठीमागे, बेगम पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०१६, २०१८, २०२१ व सन २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, सामान्य नागरीकांना मारहाण व दमदाटी करुन दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.२४३३/२०२५ दि.०९/०९/२०२५ अन्वये, इसम नामे, इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार, वय-३२ वर्षे, रा. मक्का मशिदीचे पाठीमागे, बेगम पेठ, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे.