सोलापुरात पावसाचा हाहाकार ; अक्कलकोट हायवेवर पाणी, कुंभारी कारखाना रस्ता बंद, होटगी रोड बंद, विडी घरकुल मध्ये घरात शिरले पाणी VIDEO
सोलापुरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सोलापुरात प्रचंड गोंधळ उडाला आहे. सकल भागात पाणी साचले असून अनेक रस्त्यांवर सध्या गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असल्याचे पाहायला मिळते. सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे अक्कलकोट महामार्गावर गुडघ्यावर पाणी आले असून त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तसेच कुंभारी कडून सिद्धेश्वर साखर कारखान्याला जाणाऱ्या रस्त्यावर घोड्याला पूर आल्याने तो रस्ता बंद झाला आहे. याचबरोबर जुना विडी घरकुल परिसरात सुद्धा रस्त्यावर आणि नगरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची सकाळ पाण्यातच सुरू झाली आहे. या भागात पहिल्यांदा जेवढा मोठा पाऊस आल्याचे बोलले जात असून नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. देगाव नाका परिसरातील डी मार्ट ला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अक्कलकोट नाका परिसरातील 256 गावांमधील सर्वच घरांमध्ये पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी या मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात दुचाकी वाहून गेल्याचे बोलले जात आहे. सोलापूर होटगी रोड सुद्धा ओढ्याला पूर आल्याने बंद झाला आहे त्यामुळे जड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येते.