सोलापुरात कर्मचारी संघटनांची वज्रमुठ..! जिल्हा परिषद गेटवर धरणे आंदोलन, घोषणांनी परिसर दणाणला.!
सोलापूर – विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांची वज्रमुठ..करून शासनाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद गेटवर धरणे आंदोलन, घोषणांनी परिसर दणाणून गेला. हजारो कर्मचारी या आंदोलना मध्ये सहभागी झाले होते. जिल्हा परिषद मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे वतीने एकत्रित सर्व संघटना एकत्रित करून सत्याग्रह धरणे आंदोलन दोन तास सुरू होते. रणरणत्या उन्हात १७ मागण्यांसाठी कर्मचारी एकजुटले होते.

या प्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी घोषणा देत कर्मचारी यांचे मध्ये दोष वाढविला. शिक्षक नेते सुरेश पवार, कामगार नेते अशोक जानराव, अविनाश गोडसे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन चे डाॅ. एस पी माने, महासंघाचे अध्यक्ष दिनेश बनसोडे यांची प्रमुख भाषणे झाली.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा सोलापूर व समन्वय समितीचे यशस्वी धरणे आंदोलन
लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली. या मागण्यांबाबत यापुढेही दिरंगाई होत राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. जुनी पेन्शन योजना लागू करा,
कंत्राटीकरण रद्द करा, कायम नोकर भरती चालू करा, वाहन चालक व शिपाई पदाची भरती सुरू करा, विनाअट अनुकंपा नोकर भरती सुरू करा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विनाअट सेवेत सामावून घ्या, हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राज्य सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
या धरणे आंदोलनात राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सोलापूर
महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटना सोलापूर, महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना कृती समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सोलापूर, दिव्यांग कर्मचारी संघटना
मराठा सेवा संघ जिल्हा परिषद सोलापूर, सिंचन कर्मचारी संघटना सोलापूर , सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना सोलापूर , महाराष्ट्र राज्य गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर, महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग कर्मचारी संघटना सोलापूर कोषागार कर्मचारी संघटना सोलापूर, महसूल कर्मचारी संघटना सोलापूर , भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्टेट ऑडिट कर्मचारी संघटना नागपूर शाखा सोलापूर, भूजल सर्वेक्षण कर्मचारी संघटना सोलापूर, मलेरिया कर्मचारी संघटना सोलापूर, परिवहन खाते कर्मचारी संघटना सोलापूर , जलसंधारण कर्मचारी संघटना सोलापूर ,महाराष्ट्र राज्य परिचारक कर्मचारी संघटना सोलापूर, वाहन चालक कर्मचारी संघटना सोलापूर, नोंदणी कार्यालय कर्मचारी संघटना सोलापूर, सहकार कार्यालय कर्मचारी संघटना सोलापूर, राज्य कामगार विमा रुग्णालय कर्मचारी संघटना सोलापूर, पशुसंवर्धन कर्मचारी संघटना सोलापूर, तलाठी कर्मचारी संघटना, राज्य विक्रीकर कर्मचारी संघटना, आरोग्य विभाग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना रजिस्टर जन आरोग्य कर्मचारी संघटना सोलापूर, कनिष्ठ अभियंता संघटना सोलापूर, शासकीय तंत्रनिकेतन संघटना सोलापूर, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना सोलापूर , शिक्षक समिती सोलापूर , एम एस सी बी वर्क फेडरेशन
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना
मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ या संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी महसुली विभागाच्या जमदाडे मॅडम सहकार खात्याचे अजय बचुटे सिव्हिल हॉस्पिटलचे नितीन कसबे शासकीय तंत्र विभागाचे विटकर महसुली विभागाचे रवी नष्टे जलसंपदा विभागाचे बापू शिंदे जिल्हा परिषद मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे कुष्ठरोग विभागाचे सोळुंके जलसंपदा विभागाचे मारेप्पा पंदीलोलू गृह विभागाचे दीपक पुजारी एम एस ई बी विभागाचे विलास कोले जिल्हा परिषद महासंघाचे सचिन मायनाळ कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे बाली मंडेपू महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती चे अशोक जानराव मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे शामराव जवंजाळ जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे डॉ शत्रुघ्न माने प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुरेश पवार तसेच महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे माजी राज्य सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आंदोलनाचे सूत्रसंचालन शंतनू गायकवाड यांनी केले आभार प्रदर्शन राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष राजीव साळुंखे यांनी केले. सदर आंदोलन यशस्वी होण्यासाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अमृत कोकाटे अध्यक्ष राजीव साळुंखे, संघटक किशोर सावळे, उपाध्यक्ष शंतनू गायकवाड कोषाध्यक्ष नरेश बोनाकृती, कार्याध्यक्ष गजानन गायकवाड उपाध्यक्ष मंजुनाथ गायकवाड प्रसिद्धीप्रमुख विनायक पाटील सहसचिव दीपक पुजारी देविदास शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने देखील यावेळी आंदोलन करण्यात आले यावेळी महिला सचिव निर्मला राठोड, अनुपमा पडवळे विलास मसलकर, डॉ. विभागीय संघटक एस पी माने, श्रीशैल देशमुख हे यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनास निवेदन
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (पूनमगेट) येथे दि.06 मार्च 2025 रोजी सकाळच्या सत्रात दोन तास धरणे सत्याग्रह करण्यात आले. सदर सत्याग्रहास म.रा.जि.प.कर्मचारी महासंघ जि.प.सोलापूर यांच्या वतीने सर्व जिल्हा व तालुकास्तरावरील जि.प.कर्मचारी सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू करणे, जि.प.कर्मचारी वेतनत्रुटी, कंत्राटी कर्मचारी यांना कायम करणे अशा प्रलंबित एकूण 17 मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सोलापूर यांना देण्यात आले. या प्रसंगी कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे, लक्ष्मण गळगुंडे, सचिन मायनाळ, सचिन येडसे, इरफान कारंजे, महेश केंद्रे, राजश्री कांगरे, चेतन भोसले, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, सुर्यकांत मोहिते, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, मैल मजूर संघटनेचे कानिफनाथ चव्हाण, आरोग्य कर्मचारी युनियनचे विष्णू सानेपागूल, नर्सेस संघटनेचे सुरेखा जवळकर, जि.प.अभियंता संघटनेचे विरपक्ष जेऊरे, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव, मुलाणी, मणुरे, संतोष जाधव, गणेश हुच्चे, संजय गौडगांव, विलास मसलकर, विशाल घोगरे, बालाजी बोरकर, चिन्मय घाडगे, आदलिंगे, कांबळे, स्वामी, उमाकांत कोळी, प्रमोद मोरे, रोहन भोसले, चंदू कोळी, उपस्थित होते. महिला प्रतिनिधी सुनिता भुसारे, रेणूका प्रथमशेटटी, आरती माढेकर, वैशाली शिंदे, राजश्री रोजी, श्रीम.पोरेडडी, श्रीम. एल.एम.शिंदे, श्रीम.कोळी आदि उपस्थित होते.
आज सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, नगरपंचायत-नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज पुनम गेटवर ” धरणे-सत्याग्रह” आंदोलन करणेत आले. मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित मागण्यासंदर्भात हे आंदोलन करणेत आले . शासनाने वरील लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सोबतच्या १७ प्रलंबित मागण्यांवर सत्वर ठोस निर्णय घ्यावेत. मागण्यांबाबत यापुढेही दिरंगाई होत राहिल्यास कर्मचारी-शिक्षकांना नाईलाजाने तीव्र संघर्ष करावा लागेल. हा संघर्ष टाळणे निश्चितच कर्मचारीभिमुख राज्य शासनाच्या हाती असल्याचे दिनेश बनसोडे यांनी सांगितलें.