सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ॲम्पी थिएटर कामाचा शुभारंभ
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत दिलेल्या निधीतून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मधील ॲम्पी थिएटर कामाचा शुभारंभ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमामुळे विभागीय कार्यालय क्रमांक 2 चे विभागीय अधिकारी राहुफ सरकार, उद्यान अधीक्षक आशिष जाधव, सहाय्यक अभियंता हारून सिद्दिकी, जेई आशिष घुले, इंजिनीयर महेश केसकर, उद्यान विभागाचे विश्वास शिंदे, साईट इंजिनिअर आदित्य क्षीरसागर, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, माजी नगरसेवक अमर पुदाले, चंद्रकांत सोनवणे, गौतम नागटिळक, बाळू शिंदे, भारत ढाले, अभिनंदन गायकवाड, देविदास चिंचोळकर, विजय शिवशरण, संजय मस्के, विकी शेंडगे, अमोल कदम, लखन चंदनशिवे, मेघराज गायकवाड, संकल्प कांबळे, रोहन बागले, सिद्धार्थ गायकवाड, दीपक वाघमारे, अरविंद जगताप, धोंडीबा कापुरे, अमोल कांबळे, भीमा कदम, दिलीप बांबरे, गौतम शिंदे, सतीश अडकूल, रोहन तळभंडारे तसेच महिला सुमन लगाडे, शशिकला पिडगुलकर, चंदा शिवशरण, सोनाली नवगिरे, प्रिया साखरे, यल्लचम्मा कावल, नागरबाई कदम, सुजाता सोनवणे, माधुरी सोनवणे, नम्रता कांबळे, मंगल वाघमारे, लता बनसोडे, यल्लाव्वा बनसोडे, शेवंताबाई रणदिवे व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.