सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक 21 एप्रिलला ; बोधिसत्व जयंती उत्सव मध्यवर्तीच्या अध्यक्षपदी सागर उबाळे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी सागर उबाळे, सचिव पदी रवी म्यातरोलू, उपाध्यक्ष भैय्या कांबळे, स्वप्नील धम्मकोष, खजिनदार उमर शेख तर कार्याध्यक्ष पदी अयाज दिना यांची निवड करण्यात आली.
शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या वतीने सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीची बैठक नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर माजी उत्सव अध्यक्ष सुहास सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब वाघमारे म्हणाले, सोलापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजऱ्या करणाऱ्या प्रत्येक मंडळाने 5 गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून विद्यार्थी घडवावे म्हणजे खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल असे बोलून पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार जयंती उत्सव साजरी करावी 14 एप्रिल 2024 रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची स्थापना करून 21 एप्रिल 2024 रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रबोधनात्मक देखाव्याच्या माध्यमातून मिरवणूक निघून जयंती उत्सवाची सांगता होईल आसे जाहीर केले.
त्याचप्रमाणे विश्वस्त आनंद चंदनशिवे म्हणाले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती निमित्त बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ माध्यमातून सर्व भीम सैनिकांना घेऊन नूतन पदाधिकारी ऩिवड करण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून मध्यवर्ती महामंडळाकडून होत आहे. ही चळवळ दीर्घकालीन म्हणजे जब तक सुरज चांद रहेगा बाबासाहेब आप का नाम रहेगा ही बाबासाहेबांची चळवळ मजबूत राहिले पाहिजे त्याला गतिमान करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये विविध मंडळाच्या कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिकाच्या माध्यमातून जयंती केले जाते. त्याचप्रमाणे भीमसैनिकांनी कायद्याचे पालन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केले पाहिजे पोलीस प्रशासनास सहकार्य केलं पाहिजे
यावेळी सचिव केरू जाधव, पप्पू गायकवाड, रॉकी बंगाळे, अजित बनसोडे, किसन कांबळे, पंकज ढसाळ, उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, रविकांत कोळेकर, विश्वस्त अशोक भालेराव, सिद्धेश्वर पांडगळे, एम के सिरसागर, शांतीकुमार नागटिळक, आर के कांबळे, बाबा बाबरे, गौतम खरात, गौतम चंदनशिवे, चंद्रकांत सोनवणे, आशुतोष नाटकर, विष्णू पांडगळे, अविनाश भडकुंबे, विकी शेंडगे, अमोल गोडसे, पी.आर. बनसोडे, विक्रांत दुपारगुडे, विनोद वाघमारे, लखन भंडारे, दिनेश बनसोडे, नागनाथ गायकवाड, अँड.विशाल मस्के, अश्विन सोनवणे, धम्मपाल मैंदर्गीकर, श्री सर्वगोड, महेश डोलारे, महेशकुमार मस्के, अयाज दिना, बालाजी करमकर, सतीश बनसोडे ,अनिकेत बेलाटी, अभिजीत तलाठी, अंबादास केनुरे,ओम पाथरूट, किसन कांबळे, बबन शिंदे, बापू जाधव, अजय गायकवाड, यशवंत फडतरे, रसूल पठाण, आदित्य चंदनशिवे इत्यादी मान्यवरांची मंचावर उपस्थित होती.
यावेळी धम्मपाल मैंदर्गीकर ,अमोल गोडसे, मॅडी थोरात, अमोल बनसोडे, महेश डोलारे, अक्षय गायकवाड ,सागर उबाळे, अश्विन सोनवणे, भैय्या कांबळे इत्यादी मान्यवर अध्यक्षपदासाठी इच्छुक होते परंतु बहुमताने उत्सव अध्यक्ष म्हणून सागर उबाळे यांची निवड करण्यात आली .
.