सोलापूर जिल्ह्यातील शाळेच्या या वेळेसाठी आदर्श शिक्षक समितीचा पुढाकार
सोलापूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भाने आदर्श शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या खालील प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजीव चाफाकरंडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय माळवे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख नागेश तळे, उमेश घागरे, अमोल साखरे, इत्यादी उपस्थित होते.
१) सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेची वेळ सकाळ सत्रात 7.30 ते 11.30 करण्यात यावी. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उष्णता आहे. धाराशिव, अकोला, रायगड, सांगली जिल्हा परिषदेने शाळेची वेळ 7.30 ते 11.30 केलेली आहे. त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेची शाळेची वेळ 7.30 ते 11.30 सत्रात भरवण्यात यावी .
२) थांबवलेली विस्ताराधिकारी पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया शासकीय परिपत्रकाप्रमाणे लवकरात लवकर राबविण्यात यावी.
३) न्यायालयीन प्रक्रियेतील शिक्षकांचे ऑनलाईन बदली अगोदर ऑफलाईन समुपदेशन घ्यावे.
४) पात्र विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी.
५) न्यायालयीन केंद्रप्रमुख पदोन्नत्या लवकरात लवकर कराव्यात.
६) आपसी आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता ऑनलाइन बदलीसाठी धरावी.