सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला हिणवले ! ये तो ट्रेलर है महापालिका अभी बाकी है!!
सोलापूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांचा निकाल लागला भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांपैकी केवळ चारच नगरपालिकांवर भाजपाचा झेंडा फडकला दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहिली आहे. सेनेला तीन ठिकाणी विजय मिळाला.
मोहोळ, दुधनी, सांगोला या तीन नगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मोहोळ येथे उमेश पाटील रमेश बारसकर, दूधनीत सिद्धाराम म्हेत्रे आणि सांगोल्यात शहाजी बापू पाटील हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
या विजयानंतर सोलापूर शहरात जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवून घोषणाबाजी करण्यात आली. “नगरपालिका तो ट्रेलर है, महापालिका अभी बाकी है” असे म्हणून हिणवण्यात आले आहे.
सोलापुरात भाजप स्वबळाची तयारी करत आहे, शिवसेनेकडून त्यांना युतीचे निमंत्रण देण्यात आले असून भाजपने प्रतिसाद दिलेला नाही, या नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आता सोलापुरात स्वबळाची भाषा करत आहे.
राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी मंत्री म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे. अमर पाटील, माजी शहरप्रमुख मनोज शेजवाळ, मनीष काळजे, शहरप्रमुख सचिन चव्हाण हे नेते आता एकत्र दिसत आहेत. 102 जागांवर उमेदवार देण्याची तयारी आता सर्व नेत्यांनी केली आहे. ते





















