लोकप्रतिनिधींचा आधार अन् शासनाच्या मदतीची अपेक्षा ; काँग्रेसच्या काकासाहेब कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट झाली राज्यभर व्हायरल
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला बहुतेक पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. सीना नदी धोक्याच्या बाहेर गेल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. अशात सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी आपापल्या परीने जनतेच्या मदतीसाठी सरसावले आहेत आणि त्यांना प्रशासनाची सुद्धा तितकीच मोलाची मदत मिळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान याच परिस्थितीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक वर “मदत नव्हे कर्तव्य”… अशी एक अतिशय चांगली पोस्ट टाकून सर्वच पक्षांच्या या परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या नेत्यांचे कौतुक करत शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान काकासाहेब कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले आहे ते वाचा..
# लोकप्रतिनिधीचे विशेष अभिनंदन
सोलापूर जिल्ह्यात आभाळ फाटलंय.
लोकप्रतिनिधी कसे असावेत त्याचे हे उदाहरणं आहे अशा आपत्ती च्या काळात राजकारण बाजूला ठेऊन हेवेदावे न करता राजकारण्यानी माणुसकी जपली ही खरी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे.मा यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे राजकारनात जे चांगलं त्याला चांगलं म्हणावं हे संस्कार आमच्यावर आहेत म्हणून प्रदेश काँग्रेस चा प्रवक्ता म्हणून आशा आपत्ती च्या काळात बळीराजासाठी माणूस म्हणून उभा राहणाऱ्या प्रत्येक राजकारण्याच मी अभिनंदन मनापासून करतो.
ही वेळ राजकारांणाची नाही. पक्षीय मतभेद विसरून हाताला हात जोडून माणुसकी ची साखळी उभी कारण्याची ही वेळ आहे आणि तीच सखाळी पुढे करून पाण्यात अडकलेल्या प्रत्येलाला सुरक्षित निवांरा देण्याची नितांत गरज आहे.
शेतकऱ्याची नगदी पिके पूर्ण गेलं, हाती काहीच लागणार नाही. ऊस, सोयाबीनच्या जीवावर जी स्वप्न पाहिली होती ती डोळ्याच्या आश्रूसोबत वाहून गेलीत.
पिकांसोबत शेतातली माती, जनावरं, शेतीचे साहित्य वाहून गेली. काही जनावरं दावणीलाच मरून पडली.
जणू आभाळ फाटलंय. घर, संसार, शेती,गुरे,ढोरे उघड्यावर पडलेत.
अशावेळी एक गरज आहे ती शासनाच्या मदतची व पाठीवरती हात ठेवून आधार देणाऱ्या लोकप्रतिनिधीची..
सोलापूर जिल्यातील लोकप्रतिनिधी या संकटात शेतकऱ्यांसोबत उभे आहेत. मदतीसोबतच त्यांना आधार देण्याचं काम करतायत.
सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती ताई शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना जयकुमार गोरे जी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिजीत पाटील जी ,भाजपाचे नेते तथा माजी आमदार राजाभाऊ राऊत, , असे सर्वच लोकप्रतिनिधी रस्त्यावर, शेतात, बांधावर उतरून काम करत आहेत
विशेष अभिनंदन खा प्रणिती ताई शिंदे याचे कारण कीं पायला भिंगरी लावल्यागत रानावनात, बांधवरती जातं बळीराजाला आधार देत प्रशासनाच्या सोबतीने बाधीताना मदत करत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा हर्षवर्धन सपकाळ साहेब व समस्त पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तात्काळ सर्व पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्तना मदत कारण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरे विशेष अभिनंदन सोलापूर चे पालकमंत्री मा ना जयकुमार गोरे जी यांच्या हाताला सलाईनची सुई असताना देखील शेतकऱ्याच्या बांधावरती फिरत आहेत प्रशासनाला आदेश देत तातडीने लोकांना मदत करत आहेत.
तिसरे विशेष अभिनंदन आमदार अभिजीतजी पाटील याचे रात्री 12:30 पासून लोकांच्या बांधावरती प्रशासनाच्या सोबतीने मदत करत आहेत पुरातून लोकांना बाहेर काढत आहेत आणि सुरक्षित स्थळी नेण्याचं काम करत आहेत.
विशेष अभिनंदन खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वतःचा जीव धोक्यात घालत अनेकांना पाण्यातून बाहेर काढण्याचा काम ते स्वतः करत आहेत
याच्यासह आणखीन काही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याला, बाधित परिवाराला एक आधार व धीर देण्याचे काम करत आहेत
शिवसेनेचे नेते माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत सर हे देखील परांडाहा भाग पाण्याखाली आहे तेथे थांबून सरकारशी संपर्क करत NDRF ची टीम सोबत मदत कार्य करत आहेत
.आता अपेक्षा आहे शासनाच्या तात्काळ मदतीची…
बांधावरच्या कोरड्या सरकारी बाबूच्या भेटी, पंचनामे असे शासकीय फार्स वगळत तात्काळ शेतकऱ्यांना विना शर्थ व विनाअटी मदत देण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधीनी कडून जनतेला हेच तर अपेक्षित आहे… 🙏🏻
टीप – आम्ही नेहमीच चांगल्या कामाचे कौतुक करतो. इथे विषय पक्षाचा नाही तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीचा आहे आणि लोकप्रतिनिधीकडील माणुसकीचा आणि संवेदनेचा विषय आहे.
– प्रा काकासाहेब कुलकर्णी