Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 June 2025
in crime
0
सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब
0
SHARES
768
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुध्द केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी
(डी. एन. ए. टेस्ट) ने खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला सात महिने तुरुगांत खितपत राहावे लागले होते. सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुध्द पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता ही बाब देखील न्यायालयात तिच्या उलट तपासात उघड झाली.
‘पोक्सो’ कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो, याचे जळजळीत उदाहरण असलेल्या

या प्रकरणाची हकीकत अशी की, २०२१-२२ साली मोहोळ तालुक्यातील १७ वर्षे ६ महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला बार्शी येथील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले. तेथे तिची सोनोग्राफी तपासणी केली असताना ती १५ आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले. तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले. शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला. पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला.

सदर जबाबात तिने डिसेंबर २०२१ मध्ये आरोपीने ती महाविद्यालयात गेली असताना तिला तलावाकाठी नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब कोणासही न सांगण्याबद्दल दमदाटी दिली. हा प्रकार वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने सदरची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनला पुढील तपासासाठी पाठवण्यात आली. सदर फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक झाली. तपासादरम्यान सदर गर्भ आरोपीपासूनच झाला आहे हे शाबित करण्यासाठी पितृत्व चाचणीसाठी (डीएनए टेस्ट) करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीचा रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले. तपास पुर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी, फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. तिने उलट तपासात कबुली दिली की, २०१९ साली ती गावातील एका तरुणाबरोबर घरामध्ये शरीरसंबंध करीत असताना अचानक तिचे वडील घरी आले व त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुध्द फिर्याद देण्यास लावली.

आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी आपल्या युक्तीवादात सदर तरुणीच्या उलट तपासात झालेल्या या बाबी, पितृत्व चाचणी अहवाल ( डी. एन. ए. टेस्ट ) , त्या तरुणीची विसंगतपूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. सिध्देश्वर खंडागळे यांनी काम पाहिले.
पोक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरुन सात महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

सदर तरूणीने तिच्या गावातील तरुणावर केलेला पोस्को बलात्काराचा खटला अद्याप सोलापूर न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.

Tags: Adv Dhananjay ManeAdv jaydeep maneRape case
SendShareTweetSend
Previous Post

स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

Next Post

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970953
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group