सोलापूर जिल्ह्यात मंडल अधिकाऱ्याला चाळीस हजाराची लाच घेताना पकडले
तलाठ्याने घेतलेली नोंद फेटाळली असल्याचे सांगत पुन्हा नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागून ४०००० रुपये घेणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील मंडलाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
राजेंद्र भगवान वाघमारे, वय 53 वर्ष, मंडल अधिकारी, करकंब, ता पंढरपुर, जि सोलापुर असे रंग या पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यानी विक्री केलेल्या जमीनीची नोंद
संबंधित तलाठी यांनी धरल्यानंतर ती नोद मंजूरीकारिता मंडल अधिकारी वाघमारे यांचेकडे पाठवली होती त्यानी सदर नोंद फेटाळली असल्याचे सांगून सदरची नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी वाघमारे हे रु. 50,000/- रुपये लाच मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक 8/10/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांचेकडे दिली होती.
यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ला.प्र.वि., पुणे पथकाने दिनांक 09/10/2025 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदाराने विक्री केलेल्या जमीनीची नोंद मंजूर करण्यासाठी 50,000/- रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दि.9/10/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक राजेंद्र वाघमारे, मंडल अधिकारी, करकंब, ता. पंढरपुर यांनी रायगड भवन, तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे, पंढरपुर येथे तक्रारदाराकडून 16.30 वाजण्याचे सुमारास 40,000/-रुपयाची लाच स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पंढरपुर शहर पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.