सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी
सोलापूर : विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. गोरे यांनी आपल्या नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडताना संपूर्ण सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीमय केला आहे.
या यशाचे श्रेय गोरे यांनाच द्यावे लागेल.
स्वतःच्या मतदारसंघाऐवजी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण लक्ष घातले. सोलापूरकरांना हा पालकमंत्री परका वाटू नये याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या टीकेनंतर त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. 102 पैकी तब्बल 87 जागा भारतीय जनता पार्टीचे निवडून आणल्या. त्यानंतर लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा अभूतपूर्व असे यश मिळवले.
68 पैकी 38 जागा मिळवत पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. याचे श्रेय सुद्धा पालकमंत्र्यांना जाते.
गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्याच्या पंचायत समिती सभापतींच्या निवडी झाल्या. या 11 पैकी तब्बल दहा जागा भारतीय जनता पार्टीचा सभापती झाला आहे. हा चमत्कार सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे.
यापूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 11 पैकी बहुतांश सर्वच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा सभापती व्हायचा परंतु यंदा दहा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखला आहे. भारतीय जनता पार्टीला जातीयवादी म्हणून विरोधक टीका करतात पण त्या विरोधकांना गोरे यांनी चपराक लगावली आहे. मोहोळ पंचायत समिती सभापती पदावर मुस्लिम समाजाला संधी देण्यात आली आहे.
असलम चौधरी हे बहुतांश महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टीचे पहिले मुस्लिम सभापती झाले आहेत.
या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचाराची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील आपल्या सभा रद्द केल्या. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जयकुमार गोरे यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडल्याचे दिसून आले.



















