सोलापूरचे अक्कलकोट मध्ये मोठा राडा ; संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याचं बोललं जात आहे.
प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते. तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले. पण शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरही त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले. (साभार – tv9 मराठी आणि saam tv)