सोलापुरातून एकनाथ शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र ; भरत गोगावले यांना पालकमंत्री करा
कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करा.या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना सोलापूर युवासेना पदाधिकाऱ्यांची विनंती केली आहे.
सोलापूर शहर सचिव तथा भरत शेठ गोगावले युवा प्रतिष्ठानचे समर्थ बिराजदार यांनी स्वतःच्या रक्ताने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत विनंती केलीय.अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहितील. एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहत शिवसेना वाढवण्याचे काम भरत शेठ यांनी काम केलंय त्यामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्री बनवून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.