“शाहेबाज का घर फोड्या शोएबने” ; पठाण को टेन्शन ; पोलिसांचा काही तासात छडा
सोलापूर : काँग्रेस पक्षातून एमआयएम मध्ये गेलेले शौकत पठाण यांचे चिरंजीव शाहेबाज याची घरफोडी होऊन जबरी चोरी झाली होती परंतु पोलिसांनी काही तासातच या चोरीचा छडा लावत गल्लीतील चोरट्याला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल व रोकड हस्तगत केली.
फिर्यादी शाहेबाज पठाण हा केशवनगर मौलाली चौक या ठिकाणी राहत असलेल्या घरात नसताना 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी साडेबारा ते रात्री नऊच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेर शूजमध्ये ठेवलेली घराच्या चावीने कुलूप काढून आतील दीड लाख रुपये रोख रक्कम आणि सुमारे तीन लाखाचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला होता.
शाहीबाज पठाण याने याबाबत 24 फेब्रुवारी रोजी सदर बजार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शहाजहाँन मुलाणी, पो.हे.कॉ. संतोष पापडे, पोलीस शिपाई हणमंत पुजारी, उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना लेप्रसी कॉलनी, क्रिडा संकुलमागे सोमवारी 11.40 वा. च्या एक इसम हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला दिसला.
त्याला संशयावरुन ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता, त्याने त्याचं नाव जिबरान ऊर्फ शोएब युन्नुस शेख असं असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातील पांढऱ्या पिशवीची झडती घेतली असता, त्याच्याकडे रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून आले.
त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने जिबरान ऊर्फ शोएब शेख याने रविवारी दुपारी केशव नगर येथे चोरी केल्याचे कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण प्रमुख पोउपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी सोमवारी दुपारी अटक केली.