सोलापुरात काँग्रेसला टेन्शन ; अपक्ष आतिश बनसोडे यांना वंचितने दिला पाठिंबा
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अनपेक्षितपणे या निवडणुकीतून माघार घेत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दर्शवला असून त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवार असलेले आतिश मोहन बनसोडे या आक्रमक युवा चेहऱ्याला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर पेजवर याबाबत घोषणा केली असून सोलापुरात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी अधिकृत घोषणा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचे बोलले जात होते परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार आदेश बनसोडे यांना पुरस्कृत उमेदवार केल्याने निश्चितच काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
दरम्यान बहुजन समाज पार्टीने 2019 च्या लोकसभा निवडणुकी बहुजन समाज पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरात वंचितने बसपाला पाठिंबा द्यावा अशी ऑफर दिली होती.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीने बहुजन समाज पार्टीची ऑफर डावलली आहे.