धर्मा भोसले म्हणजे धर्मकारण, राजकारण व समाजकारणाचा उत्तम समन्वय ; ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख
स्व. धर्माजी भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व वारकरी संघ, संत तुकाराम महाराज मंदिर व पालखी सोहळा सदस्य देहू, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम बाल हनुमान मंदिर नरसिंग गिरजी चाळ येथे मान्यवर व परिसरातील नागरिक बंधुभगिनींच्या, मित्रपरिवाराच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कीर्तनाचे आयोजन बाल हनुमान भजनी मंडळ ह, भ, प, महादेव बुवा शिंदे महाराज गणराज तरुण मंडळ व धर्मा भोसले सोशल फाउंडेशन यांच्या वतीने केले होते.
आपल्या कीर्तनातून ह. भ. प. जगन्नाथ महाराज देशमुख उपदेश केला की, धर्माजी भोसले यांनी आयुष्यभर गोरगरीब, दीन दुबळ्याची सेवा केली, संपत्ती पेक्षा चांगली संतत्ती, लाखमोलाची माणसे कमावली, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी प्रमाणे पुत्र विनोद आणि अमोल यांना चांगले संस्कार दिले, कायम टिकणारी एकच गोष्ट आणि ती म्हणजे माणुसकी, म्हणूनच स्व.धर्माजी भोसले यांनी पैशापेक्षा जीवाभावाची जीवलग माणसे जोडले. त्यामुळेच त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला एवढी माणसे जमली हीच त्यांची खरी संपत्ती, स्व. धर्माजी भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण शहर हळहळला, अनेकांच्या मनात आपले वैयक्तिक काहीतरी गमावल्याची भावना निर्माण झाली ही खरी श्रीमंती, यशाच्या शिखरावर असतानाही कायम पाय जमिनीवर ठेवून वावरणारे वारकरी सांप्रदायाचे परोपकारी वृत्तीचे, दानशूर उदार, व्यक्तीमत्त्व म्हणजे स्व. धर्माजी भोसले. जे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या नवीन पिढी साठी कायमच मार्गदर्शक राहतील.
यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, अमोल शिंदे, माऊली पवार, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, अनंत जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, राज सलगर, तिरुपती परकीपडंला, अरीफ पठाण, अँड मयूर खरात, सुहास कदम, संजय पाटील, प्रशांत बाबर, नागेश खरात, अनिल पल्ली, रोहित खताळ, समीर शेख, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, राजासाब शेख, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, मुन्ना तळीकेडे, विनोद क्षीरसागर, सुभाष गडदे, माणिक अक्कलवाडे, शाहू सलगर, बसू कोळी, श्रीकांत गायकवाड, अमित राठोड, नितेश पवार, मदन सलगर, नितीन जमदाडे, सचिन टिक्ते, चंद्रकांत पात्रे आदी उपस्थित होते.