सोलापुरात काँग्रेसचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा ; अमित शहा यांच्या….. ; काँग्रेसच्या घोषणांनी वेधले लक्ष
सोलापूर : राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी, अमित शहांनी माफी मागावी, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती. प्रत्येकांच्या तोंडातून जय भीमचा नारा आणि अमित शहा माफी मागा अमित शहा यांनी राजीनामा घ्यावा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुना एम्प्लॉयमेंट चौक, सात रस्ता मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचे वक्तव्य केले त्यावरून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आता त्यांच्या विरोधात देशात चळवळ सुरु झाली आहे, त्यांनी माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही.
मोर्चात शहराध्यक्ष चेतन नरोटे, माझे महापौर संजय हेमगड्डी, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, माजी नगरसेवक विनोद भोसले, सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेविकास श्रीदेवी फुलारे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, मधुकर आठवले, अशपाक बळोरगी, गणेश डोंगरे, महिला शहर अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, आशा म्हेत्रे, वाहिद बिजापुरे, बसवराज म्हेत्रे, श्रीशैल रणधीरे, संतोष सोनवणे, जितू वाडेकर, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.