सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ! मोची समाजातील पाच माजी नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश
सोलापूर : सोलापूर शहर मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचा एक गठ्ठा मतदान असलेल्या मोची समाजाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने समाजातील अनेक नेत्यांनी औरंगाबाद येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे यांचा ही समावेश आहे. या प्रवेशावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, प्रदेश नेते शहाजी पवार, अविनाश महागावकर, युवकचे अक्षय अंजीखाने, बाबुराव क्षीरसागर हे उपस्थित होते.
शहर मध्य साठी माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी महापौर संजय हेमगड्डी हे इच्छुक होते. पण काँग्रेस पक्षाने शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. नाराज झालेल्या भंडारे आणि करगुळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते पण नंतर या दोन्ही नेत्यांनी नंतर माघार घेतली.
त्यानंतर काँग्रेसला बंडखोरी शमवण्यात यश आले असे बोलले गेले. उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालय शुभारंभ कार्यक्रमाला भंडारे करगुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित नव्हते.
शनिवारी मोची समाजातीलच काँग्रेस भवनात आलेल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली की, देवेंद्र भंडारे, सिद्राम अट्टेलुर, जेम्स जंगम, नागनाथ कासलोलकर समाजातील असे काही प्रमुख नेते कुणाचाही फोन उचलत नाहीत त्यामध्ये माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचाही फोन या नेत्यांनी उचलला नसल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे माजी सभागृहनेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी नगरसेवक सिद्राम अटेलूर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका सरस्वती का, नागनाथ कासलोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता शहर मध्य मतदारसंघात भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
मोती समाजातील अनेक नेते माजी आमदार यलगुलवार यांचे ऐकणारे आहेत, तसेच रविवारी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा सोलापुरात येत आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोची समाजाला 50 ते 60 वर्ष झाले मोची समाजाचे आमदार काँग्रेस पक्षाने केला नाही. आमच्या समाजाचे आर्थिक विकास महामंडळ सुद्धा केले नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रवेशानंतर अंबादास करगुळे यांनी दिली.