सोलापुरात मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही ; मराठा समाजाने का दिला इशारा
सोलापूर : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे. परंतु अद्यापही राज्य सरकार त्यावर कोणताही तोडगा काढत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात येणार आहेत जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यास कुणालाही सोलापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.