सोलापूर शहरात पंचनामे करण्यास सुरुवात ; आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती सूचना
11 सप्टेंबर रोजी रात्री सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वज्रेश्वरी नगर, श्रीराम नगर, नवले नगर, विनायक नगर, निवारा नगर, कल्लाप्पा नगर याठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य, कपडे व संसारोप्रयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले होते व काही ठिकाणी घराच्या भिंती पडून नुकसान झालेले होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे सूचना दिल्या होत्या सूचनेनुसार आज महापालिका झोन अधिकारी, तलाठी यांना घेऊन भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करून घेतले व झालेल्या नुकसानाची नोंद करून शासनाकडे नुकसान भरपाई करीता पाठविण्यात आले,याप्रसंगी नागरिकांनी त्यांच्या झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्याकरिता टीम आली यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.
याप्रसंगी मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने ,OBC मोर्चा शहर अध्यक्ष विजय महिंद्रकर,सिद्धराम खजुरगी,अंबादास सकिनाल,अभिषेक चिंता, महापालिका अधिकारी उपस्थित होते.