अकरा किलो चांदीच्या गणपती मूर्ती प्रतिष्ठापनेने गणेश जयंती साजरी ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचा उपक्रम
सोलापूर (प्रतिनिधी)
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ तर्फे गणेश जयंती भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
गणेश जयंती निमित्त बाळी वेस येथील श्री मंदिरात सकाळी ७ वा. श्रीं ची नित्य पुजा करण्यात आली तदनंतर गणेश जयंती निमित्त तयार करण्यात आलेल्या नूतन ११ किलो चांदी च्या मुर्तीची मल्लिकार्जुन मंदिर येथे पूजा करून मिरवणुक काढण्यात आली.
मल्लिकार्जुन मंदिर, हिरेहब्बू वाडा, कुंभारवाडा, कालिका माता मंदिर, मसरे गल्ली, होटगी मठ, बाळी वेस मार्गे श्री मंदिरात आल्यावर गिरी स्वामी व सिद्धु स्वामी यांच्या पौरोहित्य खाली ‘गणेश याग ‘ प्रारंभ करण्यात आले. मिरवणुक मार्ग वर श्रींच्या मूर्ती वर विविध रंगी फुलांची उधळण करीत श्रींचे स्वागत करण्यात आले या वेळी काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते श्रीं ची पुजा करण्यात आली. त्या नंतर उत्सव अध्यक्ष गुरूशांत मोकाशी व गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते श्रींची सपत्नीक महापूजा करण्यात आली.
यावेळी कसबा गणपती प्रतिष्ठांनचे अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, सचिव मल्लिनाथ खुणे, सहसचिव शिवशंकर कोळकुर, खजिनदार केदार मेंगाणे , विश्वस्त मल्लिनाथ मसरे, रामचंद्र जोशी,सुधीर थोबडे शिवानंद बुगडे संजय दर्गो – पाटील, बिपिन धुम्मा, चिदानंद मुस्तारे, कैलास मेंगाणे मल्लिनाथ दर्गोपाटील नागेश भोगडे , प्रमोद मोकाशी, गिरीराज भोगडे बसवराज दर्गोपाटील प्रसाद लाड सोमनाथ माळशेट्टी शिवालिंग माळगे योगीराज भोगडे नागनाथ मेंगाणे अमित सिंदगी सुरज गुंगे जीवन जोशी संजय चितकोटी पुष्कराज मेत्री दिपक सुरेराव आदी उपस्थित होते.
दुपारी १२वा. श्रींचा पाळणा कार्यक्रम व गुलाल कार्यक्रम संपन्न झाले या वेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत उपस्थित भाविकांनी’ गणेश जन्म’ च आनंदोत्सव साजरा केला श्रींना नैवद्य अर्पण करण्यात आल्या नंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जवळपास हजारो भाविक भक्तांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी ५ वाजता कसबा गणपती महिला मंडळ तर्फे आयोजित सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पुष्पा भोगडे सुनिता कडगंची लता मेंगाणे , वर्षा मेंगाणे, सुजाता मेंगाणे, संगीता स्वामी, गीता मेंगाणे, रेणुका भोगडे, अश्विनी मेंगाणे मेघना मसरे, संगीता खुणे, सौ. चितकोटी, अर्चना मसरे, तेजश्री दर्गोपाटिल, सुलोचना मोकाशी पुष्पा कुताटे, ललिता जम्मा ऐश्वर्या कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिला भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
गणेश जयंती निमित्त श्रींना सोने – चांदीच्या विविध आभूषणानी सजविण्यात आले होते श्रींच्या मस्तकी अर्पित दुर्वा आणि पुष्पा नी श्रींचे मनमोहक रूपाचे दर्शन घेणारे भाविक सुखावून जात होते. श्री मंदिर व परिसरास आकर्षक फुलांसह सजविण्यात आले होते शिवाय विद्युत रोषणाई ची आरास देखील या वेळी करण्यात आली होती.
संकल्प पूर्ती
मंडळ च्या आकर्षक मूर्ती प्रमाणे चांदीची मूर्ती असावी असा मनोदय काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी काही दिवसा पूर्वी व्यक्त केला होता त्यास अनुसरून मंडळ ट्रस्टी आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने अवघ्या काही दिवसांत संकल्प पूर्ती करीत श्रींची ११ किलो वजनाची आकर्षक मूर्ती साकारली बप्पा वरील श्रद्धा आणि निःसीम भक्तीने हे कार्य सिद्ध झाल्याची भावना ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे यांनी या वेळी व्यक्त केली.