सोलापुरात मुख्यमंत्र्यांकडून आयटी पार्क ची घोषणा ; विजय देशमुख यांची मागणी अन् देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारचा सोलापूर दौरा अनेक विषयांसाठी चर्चेचा ठरला ठरत आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या सदनिकांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांना आता राहायला घर मिळाले त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक मोठा उद्योग सोलापूरला आणावा अशी मागणी तर केलीच पण त्यांनी त्यानंतर आयटी पार्क सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरला देतील असाही विश्वास व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सोलापूरला निश्चित आयटी पार्क देतो त्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क तयार करू अशी अशी घोषणा करून टाकली.
यानंतर या आयटी पार्क ची सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी केवळ मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा करून टाकली अशी चर्चा असून आता शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी या आयटी पार्क आणि विशेष करून एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क करण्याचे पत्र त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. हे पत्र कोठे यांनी 15 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले होते.

या आयटी पार्क ची घोषणा केल्याबद्दल देवेंद्र कोठे यांनी “साहेब आजच्या आपल्या घोषणामुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळाले याचा आनंद होतोय त्याबद्दल आपले त्रिवार आभार” अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
या आयटी पार्क वरून आता सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू होते का असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित केला जात आहे.




















