आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन देशमुख आमदारांकडे केली ही मागणी ; युवराज चुंबळकरांनी दिला दुजोरा ; बांधकाम क्षेत्रातील मशनरी पाहण्याची सोलापूरकरांना संधी
सोलापूर : बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने सोलापूर शहरांमध्ये 23, 24, 25 डिसेंबर रोजी मॅचकॉन्स या मशिनरी व प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जुनीमिल कंपाउंड येथे या कार्यक्रमाचे उद्घाटक बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस. एन. रेड्डी यांच्या हस्ते व सुनिल
मुंडदा व्हाईस प्रेसिडेंट्, सचिन देशमुख स्टेट चेअरमन, तसेच आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार प्रणिती शिंदे, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सोलापूर शाखेचे अध्यक्ष युवराज चुंबळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात सोलापुरातील सत्ता प्रकार बी 2 रद्द करण्याची मागणी केली यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील बी 2 हा सत्ता प्रकार रद्द होण्यासाठी इतर सहकारी आमदारांनी शासन पातळीवर रेटा लावून धरावा, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून हा विषय मार्गे लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
युवराज चिंबळकर यांनी आपल्या भाषणातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले त्यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्याने निश्चितच या विषयाला न्याय मिळेल आणि सत्ता प्रकार बी 2 सोलापुरात रद्द झाल्यास विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
सोलापूरच्या विकासासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सदैव सोबत राहील अशी ग्वाही महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे यांनी दिली.
सदर प्रदर्शनामध्ये एकूण 55 स्टॉल असून कंस्ट्रक्शन मशनरीचे 35 स्टॉल आहेत, बिल्डींग व प्रॉपर्टी 20
स्टॉल आहेत. प्लॉट व लेआउट, बॅक व इतर स्टॉल आहेत. कंस्ट्रक्शन मशनरी प्रदर्शनामध्ये खरेदी करणा-यास चांगल्या प्रमाणात खास सुट देण्यात आली आहे.