मुख्यमंत्र्यांच्या 30 लाडक्या बहिणींना ई- रिक्षाचे प्रशिक्षण ; यशस्विनीचा पुढाकार
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्याच सोलापूर जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीने पुढाकार घेत तब्बल 30 महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण दिले आहे.
जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर पुरस्कृत बोरामणी येथे यशस्विनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अनिता माळगे व MITCON व महिंद्रा गांधी मोटर्स कंपनी यांच्या माध्यमातून 30 महिलांना माल वाहतूक E rickshaw गाडीचे प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये महिलांना गाडी बद्दल महिंद्रा कंपनीचे मॅनेजर यांनी माहिती दिली व महिलांनी व्यवस्थितपणे गाडीचे ट्रायल घेतले व पुढे त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून online अर्ज भरण्यात येणार आहेत.
या ट्रेनिंग साठी महाव्यवस्थापक संतोष कोलते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.