सोलापुरात भाजपच्या प्रबुद्ध संमेलनात बुद्धिजिवी पेक्षा कार्यकर्त्यांचीच भाऊगर्दी ; ‘एमपी’च्या नेत्याला असे बनवले


सोलापूर : भारतीय जनता पार्टी वतीने देशभरात लोकसभा क्लस्टर बैठका सुरू असून, देशभरातून नेतेमंडळी महाराष्ट्र राज्यात प्रवासाकरिता आले आहेत. सोलापूर, माढा व सांगली लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठकी करिता मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल हे शनिवारी सोलापुरात आले होते.
या बैठकीला माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभरात भाजपा प्रबुद्ध संमेलनाच्या माध्यमातून बुद्धिजीवी लोकांना एकत्र करून मोदी सरकारची 10 वर्षाची कामगिरी त्यांच्यासमोर मांडत आहे.
याच अनुषंगाने सोलापूर शहरात देखील प्रबुद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संमेलनात बुद्धिजीवी लोक अपेक्षित असताना पक्षातील कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी यांचीच भाऊगर्दी जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुद्धिजीवी संमेलनात डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, शिक्षक, CA, व्यवसायिक, उद्योजक असा समाजातील उच्च शिक्षित वर्ग अपेक्षित असताना इतका मोठया नेत्याच्या समोर आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना बसवून आपल्याच पाठीवर आपणच शाबासकीची थाप मारायची अशी वेळ आल्याचे पाहायला मिळाले. पार्टी विथ डिफरनस म्हणणाऱ्या भाजपमध्ये अशाप्रकारे होत असेल तर इतर पक्षात काय चालत असेल ही चर्चा सध्या सोलापुरात रंगत आहे.