सोलापुरात भाजप काँग्रेस निधीवरून आमने-सामने ; कल्याणशेट्टींनी काँग्रेसला करून दिली जाणीव
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने शहर विकासाच्या निधीची मागणी केली त्यावेळी निधी वाटपामध्ये दूजाभाव नको म्हणून काँग्रेस मागणी करत असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र महाविकास आघाडी सत्तेत असताना निधी वाटपाची जाणीव करून दिली.
खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्वाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर अलका राठोड, विनोद भोसले, गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे, प्रमिला तूपलवंडे, भीमाशंकर टेकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. गोरे यांनी लगेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आपल्या केबिनमध्ये नेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्ष रंजिता चाकोते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांनी गोरे यांच्याकडे विकास निधी देताना, विरोधकांवर अन्याय करू नये, आम्हाला सगळ्यांना, तेव्हा पालकमंत्र्यांनी तुम्ही कुठे वेगळे आहेत, तुम्ही आमचेच आहेत की, आपल तुपल का करता, तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करा असे तुमचे लोक सांगतात मगच निधी मिळेल. पक्षपात न करता निधी द्या अशी मागणी केली.
खासदार शिंदे यांनी आमदारांना जसा निधी दिला जातो तसाच खासदारांना निधी द्यावा, पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असो निधी वाटपात तफावत वाटते असे म्हणताच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मी बोलू का? पण ताईंनी “सचिन भाऊ एक मिनिट” तेव्हा दादांनी शांत राहत सन्मानाने हात जोडले.
पालकमंत्र्यांनी मी अजून निधी वाटप केलाच नाही, त्यामुळे अन्याय करण्याचा संबंध येत नाही असे सांगितले.
प्रणिती शिंदे यांनी महापालिकेत निधी देताना अनियमितता झाल्याचे सांगितले तसे जिल्हा नियोजन समिती मधून होऊ देऊ नका अशी मागणी केली.
दरम्यान शेवटी सचिन कल्याणशेट्टी यांनी पालकमंत्र्यांना सांगताना जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सगळ्यांना योग्य न्याय द्या, पण ताईंच्या माहितीसाठी सांगतो मागच्या टर्ममध्ये तुम्ही माझ्यासोबत आमदार होतात, तुमची सत्ता होती, अडीच वर्षांमध्ये, तुम्ही त्यांना काय द्यायचं ते द्या पण तेव्हा किती निधी मिळाला याची आकडेवारी काढा असे सांगत काँग्रेसला आठवण करून दिली.