सोलापुरात श्री भगवान परशुराम जयंती निमित्त 9 एप्रिल रोजी शोभायात्रेचे आयोजन
सोलापूर : ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जुळे सोलापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. 10 ते 14 एप्रिल दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या क्रिकेट स्पर्धेत पुरुषांचे दहा, महिलांचे चार तर पुरुष पौरोहित्य दोन संघ सहभागी होणार आहेत. सोमवार दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य टिळक यांचे वारसदार रोहित टिळक (पुणे) यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता घनपाठी ब्राह्मणांकडून पावमान यज्ञ व लघु रुद्र अभिषेक करण्यात येणार आहे. याचे यजमान श्री व सौ दैदीप्यमान वडापूरकर यांच्यासह पाच दांपत्य राहणार आहेत. दुपारी 5 ते 9 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता जुळे सोलापुरातील केलई हायस्कूल येथून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत श्री भगवान परशुराम महाराज मूर्तीचे भव्य स्वागत आणि प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. केलई हायस्कूल येथून सायंकाळी 5.30 वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत लेझीम ताफा, विविध खेळ, भजनी मंडळ यासह विविध पथके सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरुष मंडळी सहभागी होत आहेत.
या पत्रकार परिषदेस प्रा काकासाहेब कुलकर्णी, निखिल देशपांडे, अनिता कुलकर्णी, शर्वरी रानडे, विक्रम ढोनसळे, अनिता कुलकर्णी, सुप्रिया जोशी, योगेंद्र पूजारी, उन्मेष कुलकर्णी आदी उपस्थित होते.
====================