सोलापुरात बाल श्रामनेर शिबिर उत्साहात ; 32 मुलांचा सहभाग
सोलापूर : भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखा आयोजित बाल श्रामणेर शिबिर सांगता समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मीराताई आंबेडकर यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त हे श्रामणेर शिबिर शिक्षक हाउसिंग सोसायटी वेळुवन बुद्ध विहार येथे घेण्यात आले. या शिबिराचा सांगता झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब वाघमारे होते तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नागसेन माने व विशाल ढेपे यांनी केले. या समारोप कार्यक्रमास पुज्य भन्ते बी सारीपुत्र, निधी बँकेचे डॉक्टर अरुणकुमार इंगळे, सोलापुरातील नामवंत डॉक्टर सुरेश कोरे, वेळुवन बुद्ध विहारचे व्यवस्थापक प्रदीप ताकपेरे, सुनील डांगे, महिला विभागाच्या महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक शारदा गजभिये, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष निर्मला कांबळे, जिल्हा सरचिटणीस नंदा काटे, आशा शिवशरण, मंगल सूर्यवंशी, बाबुराव रणखांबे, बुद्धरत्न लंकेश्वर, राजेंद्र माने, उपाध्यक्ष श्याम शिंगे, अंगद मुके, शहराचे अध्यक्ष विशाल गायकवाड, सुमित डोलारे, रमा ढावरे, वैशाली उबाळे, दीपक आठवले, संजय दुपारगुडे यांची उपस्थिती होती.
या बाल श्रामनेर शिबिरात एकूण 32 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे, देशसेवा वाढीस लागावी व नैतिकतेचे जीवन त्यांनी जगाव याच्यासाठी हे संस्कार देण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले.
मनुष्याला सुखी होण्यासाठी संस्काराची ही गरज असते. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आवश्यक आहे. त्याप्रमाणे नैतिकतेचे संस्कार आपण आपल्या मुलावर लहानपणापासून केले तर आपले मुलं चांगल्या प्रकारे आपले जीवन जगतील त्यामुळे अशी शिबीर वारंवार घ्यावी असे प्रतिपादन डॉक्टर अरुणकुमार इंगळे यांनी केले.