सोलापुरात बी. आर. मंडळाची अभिवादन रॅली ; महिला – बालकांचे महामानवाला वंदन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बी.आर क्रीडा व युवक सेवा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही मेणबत्ती रॅली (अभिवादन रॅली) काढण्यात आली.
ही रॅली हबूवस्ती येथील जेतवन बुद्ध विहार येथून सुरू होऊन मरीआई चौक,भय्या चौक, रामलाल चौक मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदनेने रॅलीची सांगता करण्यात आली,
यावेळी बी.आर क्रीडा मंडळाचे प्रमुख माजी नगरसेवक एन.के. क्षीरसागर, दीपक आव्हाड, कुणाल क्षीरसागर, सतीश सोनवणे, चंदन क्षीरसागर, नंदीत गायकवाड, तुषार चंदनशिवे, बापू क्षीरसागर, श्रीकांत कांबळे, सचिन फडतरे, अतुल गायकवाड, प्रवीण रणदिवे, राहुल भालेराव, आकाश प्रेक्षाळे, अजय गेजगे, किरण तुळसे, रतीकांत क्षीरसागर, किरण कांबळे, रवी ससाणे तसेच मंडळाचे सभासद, पदाधिकारी, महिला भगिनी व लहान मुलांची मोठी उपस्थिती होती.