पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की ; अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील प्रकार ; गुन्हे दाखल
सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सांगता मिरवणुकी दरम्यान आवाजाची मर्यादा वाढवून समजवायला गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीर फकिरा तरुण मंडळाचे अतिश राजू धडे अध्यक्ष २) प्रेम दिपक जाधव-उपाध्यक्ष ३) ओंकार सैफन डोलारे-सेक्रेटरी ४) अनिकेत बागडे-खजीनदार ५) सौदागर सुधीर क्षीरसागर-अधारस्तंभ सर्व रा- सोलापूर व इतर ४ ते ५ पदाधिकारी तसेच एस. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था या मंडळाचे ओंकार अरविंद मस्के यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सांगता मिरवणुक मध्ये वीर फकिरा तरूण मंडळ सोलापूर या मंडळातील नमुद आरोपीत मजकूर यांनी त्यांचे मंडळात साऊड सिस्टीमध्ये हिंदी व मराठी गाण्याचा आवाज जास्त ठेवून डॉल्बी सिस्टीमचा वापर करून त्याचे आवाजामुळे त्या भागातील इतराचे जिवीतास धोका निर्माण करीत डॉल्बी सिस्टीमचा आवाज १००.६ एलएईक्यू असे तिव्रतेपेक्षा जास्त ठेवून पर्यावरण संरक्षणाचे नियमाचे उल्लघन केले आहे तसेच पोनी बंडगर यांनी त्यांना तुमच्या मिरवणुकीमुळे मागील मंडळाना पुढे जाता येत नाही तुमचे मंडळ पुढे घ्या असे समजावून सांगत असताना यातील आरोपी क्र ५ यांनी आम्ही पुढे जाणार नाही तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे म्हणून मंडळातील देखाव्या चे टॅक्ट्रर समोर रस्त्यावर आडवे झोपले व इतरांनी मांडी घालून बसून इतर मंडळाना पुढे जाण्यासाठी अडथळा आणला तसेच पोनी बंडगर, सफौ शेख, पोह जाधव पोह देंडे यांना धक्काबुक्की करून मागे ढकलून शासकीय कामात अडथळा आणला आहे.
तसेच एस. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था या मंडळास रस्त्याचे उजव्या बाजूने येणेबाबत आदेश असून सदर आदेशाचे पालन न करता डाव्या बाजूने येवून सार्व रस्त्यास अडथळा निर्माण होईल असे विनापरवाना मंडळाची वाहने उभे करून विर फकीरा तरूण मंडळ न्यु बुधवार पेठ या मंडळास पुढे जाणेस प्रतिबंद करून रस्ता आडवून सांगता मिरवणुकमध्ये बाधा होईल असे कृत्य केले आहे.